मुंबई – अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रवीण तरडेला त्याच्या जन्मदिवसानिमित्त अभिनेता प्रसाद ओकने हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. देऊळ बंद,मुळशी पॅटर्न,सरसेनापती हंबीरराव आणि धर्मवीर असे दर्जेदार चित्रपट देऊन प्रवीण तरडेने मराठी इंडस्ट्रीह बॉलिवूडमध्ये देखील आपली छाप पाडली आहे.अभिनेता,दिग्दर्शक आणि लेखक अशा प्रमुख भूमिकांमध्ये त्याने दिलेले सर्वच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
प्रसाद ओकने धर्मवीर चित्रपटामध्ये स्वर्गीय आनंद दिघेंची भूमिका साकारली होती. हाच संदर्भ देत प्रसादने प्रवीणसाठी एक खास पोस्ट केली आहे.आपल्या पोस्टमध्ये प्रसाद म्हणतो,”प्रिय प्रविण वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा…!!! माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे प्रसन्न हास्य कायम ठेवण्याचा प्रयत्न मी धर्मवीरच्या पुढच्या भागातही करेन अशी खात्री देतो.तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुझ्या सर्व कलाकृतींना भरघोस यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…”. तसेच प्रसादने यावेळी प्रवीण सोबतच धर्मवीर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
धर्मवीर चित्रपटातून शिवसैनिक आनंद दिघे यांचा जीवनप्रवास प्रवीण तरडेने उलगडला होता. आता त्याच्या जन्मदिवसानिमित्त प्रसाद ओकने केलेल्या या पोस्टनंतर धर्मवीर चित्रपटाचा पुढचा पार्ट देखील येणार का याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. प्रवीण तरडे लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित वीर दौडले सात या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.