मुंबई – धर्मवीरमध्ये प्रमुख भूमिका आणि चंद्रमुखीमध्ये दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसलेल्या प्रसाद ओकला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल. कमर्शिअल सिनेमा करताना ‘पिकासो’ सारखा दर्जेदार परंतु कमी बजेट सिनेमा करून प्रसादाने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. आता नवीन वर्षानिमित्त प्रसाद ओकने एक मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे त्याचे चाहते देखील चांगलंच खुश झाले आहेत.
नवं वर्षानिमित्त प्रसादाने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. “तोच मी प्रभाकर पणशीकर” असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपट दिग्गज व्यक्तिमत्व प्रभाकर पणशीकर यांच्यावरील बायोपिक असल्याचे समजते. आपल्या सोशल मीडियावरून एक पोस्ट करत प्रसादाने याबाबत मनहिति दिली आहे. नवं वर्ष…नवं स्वप्न…सोबत जुनेच मित्र कलावंत…आणि…आशीर्वाद देणारे आहेत “पंत” असे कॅप्शन देत प्रसादाने ही पोस्ट शेअर केली आहे.
नवं वर्ष…
नवं स्वप्न…
सोबत जुनेच मित्र कलावंत…
आणि…
आशीर्वाद देणारे आहेत “पंत”@Sunilphadtare5 @Prajaktdeshmukh @gokulmahajan90@unbollywood pic.twitter.com/P4fUkE0At1— Prasad Oak | प्रसाद ओक (@prasadoak17) January 2, 2023
आणि डॉ. काशिनाथ घाणेकर तसेच हर हार महादेव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे अभिजित देशपांडे या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक आहेत. काशिनाथ घाणेकर यांच्या बायोपिकमध्ये देखील प्रभाकर प्राणशीकर यांची झलक पाहायला मिळाली होती. प्रसाद ओक यांच्यासह आणखी व या प्रोजेक्टमध्ये दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पणशीकर यांच्याबाबतच्या इतर अनेक गोष्टी आता उलगडणार असल्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा चांगलीच वाढली आहे.