मुंबई – आनंद दिघे यांच्यावर आधारित ‘धर्मवीर’ (Dharmveer Movie) हा सिनेमा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. प्रवीण तरडे (Pravin Tarade) दिग्दर्शित या सिनेमाने दमदार कमाई देखील केली. विशेष म्हणजे या सिनेमानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. आता धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग (Dharmveer 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा मुहूर्त मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पार पडला.
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे (Anand dighe) यांचे जीवन फक्त तीन तासांच्या एका सिनेमातून दाखवता येणे शक्य नव्हते. त्यामुळे या दुसऱ्या भागातून त्यांच्या व्यक्तीमत्वाचे अजून काही पैलू आपल्याला नक्की पहायला मिळतील असे मत यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले. (CM Shinde ananad dighe)
आनंद दिघे हे कधीही कोणत्या धर्माच्या विरोधात नव्हते. गरजू व्यक्तीला मदत करताना ते कधीही त्याची जात, धर्म, पक्ष याचा विचार करत नसत. आपल्या समोर मदतीसाठी आलेल्या माणसाची अडचण किती गंभीर आहे पाहून त्याला तात्काळ मदत मिळवून द्यायचे अशी त्यांची ख्याती होती. फक्त ठाण्यापूरतेच नव्हे तर देशभरात त्यांचे कार्य पसरले होते असं देखील यावेळी शिंदे म्हणाले. (Dharmveer shoot start)
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb thackeray) यांचे विचार आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगिकारून राज्याची वाटचाल सुरू असून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
#धर्मवीर_२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या सिनेमाचा मुहूर्त आज ठाण्यात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. यावेळी माझे सहकारी मंत्री दादा भुसे तसेच सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे, आमदार प्रताप… pic.twitter.com/U45dvDJZ1K
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) November 27, 2023
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, अभिनेते प्रसाद ओक, धर्मवीर-२ सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते-निर्माते मंगेश देसाई, अभिनेते क्षितिज दाते, अभिनेते प्रकाश परदेशी तसेच सिनेमाच्या टीममधील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.