हडपसर – शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी ‘धर्मवीर दहीहंडी’ उत्सव आयोजित केला आहे.प्रसिध्द अशी जेबीएल साऊंड सिस्टीम, लेझर लाईट्स, ढोल ताशा पथक यासह अनेक कलाकार हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत.
हडपसर भागात गोपाळकाला यादिवशी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळाकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे जास्तीत जास्त दहीहांडी फोडून लाखोंची बक्षिसं जिंकण्यासाठी गोविंदा पथक उत्सुक आहेत.
‘धर्मवीर दहीहंडी’ या उत्सवाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी गुरुवारी ,सायंकाळी सहा वाजता हांडेवाडी रोडवरील श्रीराम चौकात परिसरातील नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक नाना भानगिरे यांनी केले आहे.
कुठल्याही प्रकारचा संभ्रम मनात न ठेवता मोठया आनंदाने आणि उत्साहाने दहीहंडी उत्सव साजरा करा, हे करताना पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असेही भानगिरे यांनी आवाहन केले आहे