पंढरपूर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (maratha reservation) जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनावर गुरुवारी रोजी तोडगा काढण्यात आला. पण आता धनगर समाजाने (Dhangar Samaj) आरक्षणासाठी (reservation) आंदोलनाची हाक दिली आहे. धनगर समाजाकडून माळशिरस येथे रास्ता रोको करण्यात आले.
यामुळे पुणे, सातारा, पंढरपूर मार्ग हा दोन तासांपेक्षा अधिक काळ बंद ठेवण्यात आला होता. माळशिरस येथे अहिल्यादेवी चौकात धनगर समाजाकडून रास्ता रोको करण्यात आले. यासाठी मोठ्या संख्येने धनगर समाज अहिल्यादेवी चौकात जमला होता.
यावेळी धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील आंदोलनात हजेरी लावली.
चौंडी येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे यावेळी माजी आमदार रामहरी रूपावर यांनी सांगितले. त्यामुळे आता मराठा समाजानंतर धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळत आहे.