नवी दिल्ली :- नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयाने इंडिगो विमान कंपनीच्या वैमानिकाचा व सहवैमानिकाचा परवाना अनुक्रमे तीन महिने आणि एक महिना कालावधीसाठी निलंबीत केला आहे.
गेल्या महिन्यात अहमदाबाद विमानतळावर उतरताना या विमानाच्या शेपटाकडील भाग जमीनीवरील एका वस्तुला धडकला होता.
टेक ऑफ किंवा लॅंडिंग दरम्यान जेव्हा विमानाची शेपटी किंवा एम्पेनेज जमिनीवर किंवा इतर कोणत्याही स्थिर वस्तूला आदळते तेव्हा त्याला टेल स्ट्राइक असे म्हणतात. अशा प्रकारचे टेल स्ट्राईक या विमानाबाबत झाले होते.
15 जून रोजी अहमदाबाद येथे लॅंडिंग करताना हा प्रकार घडला होता, पण सुदैवाने या घटनेत कोणलाही दुखापत झाली नाही.या वैमानिक आणि सहवैमानिकांनी लॅंडिग करताना प्रचलीत प्रणालीचा अवलंब करताना निष्काळजीपणा दाखवला होता असे महासंचालनालयाच्या चौकशीत आढळून आले होते.