नवी दिल्ली – केंद्रीय हवाई वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी आज नवी दिल्लीहून अयोध्या ते अहमदाबाद थेट विमानसेवेचे उद्घाटन केले. या उद्घाटनामुळे, अहमदाबादहून अयोध्येला जाण्यासाठी दर आठवड्याला तीन थेट विमान फेऱ्या उपलब्ध होतील.
या मार्गावर इंडिगो कंपनीच्या विमानांचे परिचालन होणार असून आज पासून प्रत्येक आठवड्यात तीन वेळा एकीकडे अहमदाबाद हे शहर भारताच्या आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक आहे तर दुसरीकडे, अयोध्या शहर भारताच्या अध्यात्मिक आणि नागरी संस्कृतीच्या समृद्धीचे प्रतिनिधित्व करते.
थेट हवाई सेवेमुळे या शहरांच्या आर्थिक विकासामध्ये योगदान देईल, तसेच प्रवास आणि पर्यटन यांच्या वाढीसाठी देखील उपयुक्त ठरेल, असे ज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ इमारतीची बाह्य रचना राम मंदिरापासून प्रेरणा घेऊन उभारली असून, टर्मिनल इमारतीमध्ये लावलेली सुंदर चित्रे आणि शिल्पकृती यांतून भगवान रामाच्या जीवन प्रवासाचे दर्शन घडते.
पुढच्या महिन्यापर्यंत, उत्तर प्रदेशात आझमगड, अलिगढ, मुरादाबाद, श्रावस्ती आणि चित्रकुट अशा पाच ठिकाणच्या विमानतळांचे कार्य सुरु होईल. याखेरीज, 2024 च्या अखेरपर्यंत जेवार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील परिचालनासाठी सज्ज असेल. भविष्यात, उत्तर प्रदेशमध्ये एकूण 19 विमानतळांची सोय होणार आहे.
केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की सध्या 6500 चौरस मीटरवर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ इमारतीचा विस्तार झालेला असून भविष्यात 50,000 चौरस मीटर क्षेत्रावर या विमानतळाचा विस्तार करण्यात येणार आहे.
त्याच पद्धतीने सध्या 2200 मीटर लांबीचा असलेला रनवे 3700 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे जेणेकरून आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अयोध्येहूनच अधिक मोठ्या आकाराच्या विमानांची येजा होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.