भुलेश्वर – पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील श्रीक्षेत्र भुलेश्वर देवस्थान येथे आज महाशिवरात्रीनिमित्ताने सुमारे लाखांवर भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. सकाळी सात वाजता पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सपत्निक महापूजा केली.
यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, माजी सदस्य विराज काकडे, पंचायत समिती सदस्या सुनिता कोलते, माळशिरसचे सरपंच महादेव बोरावके, भुलेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, उपसरपंच मोहन यादव, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय डोंबाळे, राजेंद्र गद्रे, रुपाली गुरव परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते .
दिवसभरात उपविभागीय अधिकारी आण्णासाहेब जाधव, संदिप भोसले, दौंडच्या माजी आमदार रंजना कुल, सिनेअभिनेते सचिन गवळी, सुभाष यादव व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दर्शनासाठी हजेरी लावली. दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणुन मंदिराभोवती दर्शन रांग तयार करण्यात आली. माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली. जेजुरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भुलेश्वर भक्तांच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.