वाघळवाडी -बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र सोमेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त सुमारे सत्तर हजारांवर भाविकांनी शंभू महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते दुपारी साडेबारा वाजता महाअभिषेक करण्यात आला.
यावेळी विश्वस्त शशिकांत मोकाशी, प्रताप भांडवलकर, डॉ. कुलदीप काकडे, प्रवीण भांडवलकर, वैभव भांडवलकर, सोमनाथ भांडवलकर, सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रमोद काकडे, ऋषिकेश गायकवाड, शहाजीकाका काकडे, रमाकांत गायकवाड, जया गायकवाड, संचालक विशाल गायकवाड, माजी संचालक बाळासाहेब गायकवाड, शिवभक्त घनःश्याम पडवळ मान्यवर हजर होते.
सात दिवस चाललेल्या महारुद्र अभिषेक सांगता आज दुपारी कर6ण्यात आली. विश्वसेवा संस्थेचे स्वयंसेवकांतर्फे पूर्ण यात्रा कालावधीत नियोजनात मदत करण्यात आली. भाविकांना उद्योजक दादा शिंदे, गणेश शेंडकर, राहुल हंडाळ, रुपचंद शेंडकर यांचेद्वारे महाप्रसाद वाटण्यात आला. वडगाव निंबाळकरचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
प्राथमिक आरोग्य केंद्र होळचे डॉ. मनोज खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली परवेझ मुलाणी व सहकारी वर्गाद्वारे भाविकांना आरोग्य सेवा देण्यात आली. एस. टी. महामंडळाद्वारे पुणे-बारामती येथून विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या.