पुणे – पुण्यातील हडपसर येथील एका कागद पुठ्ठयाच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या दाखल झाल्या आहेत.
हडपसर येथील सातव नगरमधील स्वामी विवेकानंद इंडस्ट्रियल एरियातील कागद पुठ्ठा असणाऱ्या गोडाऊनमधे भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ फायरगाङ्या दाखल झाल्या असून जवानांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.