कोलकाता- शनिवारपासून देशभर सुरु झालेला नवरात्रोत्सव पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, त्यानिमित्त उभारण्यात आलेल्या दुर्गा पूजा मम्डपात भक्तांना प्रवेश बंदी असणार आहे. कोलकता उच्च न्यायालयाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. बंगालमधील सर्वात मोठ्या उत्सवाच्या अवघ्या तीन दिवस आधी कलकत्ता उच्च न्यायालयाने हा आदेश देताना सांगितले की, करोनावायरसचा उद्रेक पाहता मोठ्या मंडपांसाठी 25 संयोजकांसाठी तर लहान मंडपांसाठी 15 संयोजकांना प्रवेश असेल.
कोलकता उच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की, सर्व मंडपांनी त्यांच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेड्स लावणे अस्त्यावश्यक राहील. मोठ्या मंडपांसाठी हे अंतर 10 मीतर्स तर लहान मंडपांसाठी हे अंतर पाच मीटर असेल. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने या नियमांचे अनुपालन करण्याची गरज असल्याचे सांगून उच्च न्यायालयाने सांगितले आहे की, कोलकातामध्ये शहरातील 3000 पेक्षा जास्त मंडपांमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारडे पुरेसे पोलिस नाहीत.
गेल्या महिन्यात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी “यावर्षी लॉकडाऊनमध्ये कोरोनव्हायरसला दूर ठेवण्याची आणि मगच दुर्गापूजा आयोजित करण्याची योजना” जाहीर केली होती.
विरोधकांचे नाव न घेता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही यावर्षी नक्कीच दुर्गापूजेचे आयोजन करू. आम्हाला कोणत्याही किंमतीत गर्दी टाळावी लागेल; कारण आपण पूजेला सार्वजनिक स्वरुपात परवानगी दिलेली नाही.
पश्चिम बंगालमध्ये कोव्हिड19 च्या बळींच्या संख्येने सहा हजाराचा टप्पा ओलांडला असून गेल्या 24 तासांत आणखी 64 जण मरण पावल्याने दुर्गापूजेवरील निर्बंध कडक करण्यात आले आहेत.