जनतेचा परिवर्तन घडविण्याचा निर्धार

डॉ. भोसले यांचा कालवडे येथे प्रचारसभेत विश्‍वास
कराड – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याबरोबरच केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचलेली आहेत. त्यामुळे पुन्हा भाजप शिवसेना महायुतीचेच सरकार सत्तेमध्ये येणार आहे. भाजप सरकारची ही विकासाची दृष्टी पाहून कराड दक्षिणच्या जनतेने आता परिवर्तन घडविण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.

कालवडे (ता. कराड) येथील जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, कृष्णा बॅंकेचे संचालक शिवाजीराव थोरात, कराड कराड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन काशिद, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, विवेक पाटील, डॉ. सारिका गावडे, व्ही. के. मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अतुल भोसले म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून राज्यात सिंचन, कृषी, आरोग्य, रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना राबविल्या आहेत. येत्या काळात विकासाची ही गंगा कराड दक्षिणमध्ये गतिमान करण्यासाठी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

मदनराव मोहिते म्हणाले, अतुल भोसले यांनी गेल्या पाच वर्षात दक्षिण मतदारसंघात केलेले कार्य लक्ष वेधून घेणारे आहे. सत्तापद नसताना त्यांनी एवढा निधी आणला. आमदार झाल्यावर याच्या पाचपट निधी ते भाजप सरकारच्या माध्यमातून आणतील. त्यामुळे यावेळी सर्वांनी मिळून अतुलबाबांना आमदार करुया, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सुनिल पाटील म्हणाले, भाजप सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदार संघामध्ये विविध विकासकामे सुरु आहेत. अतुलबाबांच्या प्रयत्नातून या मतदार संघामध्ये भाजप सरकारने कोट्यावधींचा निधी दिला आहे. अशा या कर्तृत्ववान नेतृत्वास काम करण्याची संधी मतदार संघातील सुज्ञ जनतेने दिली पाहिजे. डॉ. अतुल भोसले या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलतील. यावेळी डॉ. अमोल मोटे, विष्णू थोरात, दादासो थोरात, रतन थोरात, तात्यासो थोरात, मारुती थोरात, संपत तडाखे, जयकर माने, सुहास गाडे, सिकंदर जाधव, भानुदास शिंदे, प्रशांत गाडे, आनंदा गाडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)