साहित्य क्षेत्रातील दोन वर्षांसाठीचे नोबेल जाहीर

ओल्गा टोकारझूक आणि पीटर हांडके यांना पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रासाठीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा 2018 आणि 2019 या दोन वर्षांसाठीचे साहित्य क्षेत्रातील नोबेल जाहीर करण्यात आले आहेत. 2018 वर्षासाठीचा नोबेल पुरस्कार प्रख्यात पोलिश लेखिका ओल्गा टोकारझूक यांना तर 2019 साठीचा नोबेल पुरस्कार ऑस्ट्रियन लेखक पीटर हांडके यांना जाहीर झाला आहे.

लैंगिक छळवणुकीच्या प्रकारावरून गेल्यावर्षीचा साहित्य क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार त्यावर्षी जाहीर करण्यात आला नव्हता. साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. दरवर्षी याच काळात विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. यंदाच्यावर्षी आतापर्यंत नऊ नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

ओल्गा टोकारझूक यांचा जन्म 1962 मध्ये पोलंडमध्ये झाला. 1993 मध्ये त्यांचे पहिले पुस्तक Podroz Iudzi Ksiegi प्रकाशित झाले होते. 1996 मध्ये आलेले त्यांची Prawiek i inne czasy ही कादंबरी विशेष गाजली होती. पीटर हांडके यांचा जन्म 1942 मध्ये झाला. 1966 मध्ये त्यांचे पहिले पुस्तक Die Hornissen प्रकाशित झाले होते. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here