भोर, (प्रतिनिधी) – चिखलावडे (ता.भोर) येथील नवयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंतीचे कार्यक्रमात भोर तालुक्यातील ऐतिहासिक घराण्यातील वारसांचा सत्कार करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमात यावर्षी शिवज्योत किल्ले अजिंक्यतारा ते चिखलावडे खुर्द आनण्यात आली. भोर तालुक्यातील शिवस्वराज्य काळातील सरदार यांच्या वशजांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये विररत्न सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे, सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज राहुल कंक आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज आदित्य देशपांडे यांचा समावेश होता.
या वेळी भोर तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष संजय भेलके, उपाध्यक्ष सारंग शेटे, कुणाल धुमाळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बापूराव अंकुश मोरे (सांगली) यांचे शिव व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सर्व सभासद यांचे सहकार्य लाभले असल्याचे योगेश कोंढाळकर यांनी सांगितले.