उपमहापौर तुषार हिंगे यांचा राजीनामा

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आज राजीनामा दिला. महापौर माई ढोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा दिला. महापौरांनी त्यांचा राजीनामा स्वीकारून पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.

एवढ्या तडकाफडकी राजीनामा दिल्याने महापालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मात्र राजीनामा का दिला ? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.  सूत्राच्या माहितीनुसार पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.