पाटणा: पाटणा शहरातील अनेक भागात पाणी साठले असून अनेक घरांमध्ये कचराहीं वाहून आला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या पाटणावासियांनी आज उपमुख्यमंत्री व भाजप नेते सुशिलकुमार मोदी यांच्या निवासस्थानालाच घेराव घातला.
काल रात्री पाटण्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राजेंद्र नगर, कंकर बाग, पाटलीपुत्र कॉलनी इत्यादी भागातील घरांमध्ये पाणी घुसले त्याचा राग तेथील रहिवाशांनी मोदींच्या निवासस्थानाला घेराव घालून व्यक्त केला.
गेले पंधरा दिवस तेथे साठलेले पाणी कमी झालेले नाही अशी नागरीकांची तक्रार होती. काही दिवसांपुर्वी खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातच पाणी घुसले होते.
त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना एसडीआरएफ च्या लोकांच्या मदतीने बाहेर काढावे लागले होते. आजच्या निदर्शनांच्यावेळी उपमुख्यमंत्री त्यांच्या निवासस्थानी नव्हते.