बस पासपासून विद्यार्थी वंचित

सातारा : सातारा बसस्थानकात सवलतीच्या पासासाठी लागणारे अर्ज मिळत नसल्याने विद्यार्थी एक आठवडा झाला पासापासून वंचित आहेत. ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तर काहींनी पास मिळेपर्यंत काॅलेज नकोच असा पवित्रा घेतल्याचे वास्तव आहे. याबाबत एसटीच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपस्थित राहू शकले नाही.


सध्या शाळा, महाविद्यालये सुरु झाल्याने सवलतीचे पास घेण्यासाठी बस केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. परंतु, पासासाठी लागणारे अर्ज मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.