जर तुम्ही फेसऍप युजर आहात, तर हे नक्की वाचा..

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्‌सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्‌वीटर ओपन केल्यावर म्हातारपणाचा विषय चांगलाच रंगलेला दिसत आहे. आपण म्हातारपणी कसे दिसू याचाच ट्रेंड सध्या व्हायरल होत आहे. फेसऍप या ऍपच्या मदतीने हे सगळं घडून आलं आहे.

फेसऍप आहे तरी काय?
फेसऑपमध्ये इन्स्टाग्रामप्रमाणे अनेक फिल्टर्स आहेत. मात्र त्यातील ओल्ड फेस फिल्टर हे खूपच लोकप्रिय झाले. या फिल्टरचा वापर करुनच अनेकांनी आपला लुक वयस्कर केला. फेसऍप हे पूर्णपणे आर्टिफिशल इंटलिजन्स वर काम करते. आपण फोटो अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तो फोटो पुरुषाचा आहे की महिलेचा ते ऍनऍपच्या सिस्टमकडून समजून घेतले जाते. त्यानंतर फोटोतील हावभाव आणि चेहरेपट्टी पूर्ण पणे बदलून जाते. मात्र, ही सगळी आर्टिफिशियल सिस्टीम फक्त इंटरनेवरच चालू शकते. आणि या ऍसपची सिस्टीम एवढी वेगवान आहे की एका क्‍लिक वर तुमचा चेहरा वयस्कर दिसण्यास सुरुवात होते.

फेसऍप घातक ठरू शकते का?
आपण पाहिलं की फेसऍपला पूर्णपणे इंटरनेटची गरज भासते आणि ऍपमधील तुमचे सर्व फोटो हे क्‍लाउडमध्ये सेव्ह होतात. ऍपच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार त्यात नमूद केले की, युजरने एकदा फोटो अपलोड केले की तसेच साठून ठेवले जातात. कंपनी त्या फोटोचा वापर अन्य कोणत्या मार्गाने करू शकते. तुमचे मूळ फोटो आणि एडिट केलेले फोटो यांची कंपनी विक्री किंवा ते भाड्याने सुध्दा देऊ शकते. तसेच तुमचे फोटो कुठेही वापरू शकते. तुमच्या फोटोवर पूर्णपणे कंपनीचा हक्क राहणार. त्यामुळे कंपनीच्या या अटींविरोधात तुम्ही आवाज उठवू शकत नाही.

– ऋषिकेश जंगम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)