राहुरी विद्यापीठ – टाकळीमियॉ येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकनेते पद्मभूषण डॉ बाबासाहेब विखे प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषिदूतांनी टाकळीमियॉ (ता.राहुरी) येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना निबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्याक्षिक करून दाखवले.
रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम कमी व्हावेत व शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेतीकडे वळावा यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना निबोळी अर्क कसे तयार करावे याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. या अर्कमुळे कपाशी वरील बोंडअळी, मावा, तुडतुडे नाकतोडे यांच्यासारख्या कीटकाचे नियंत्रण होते.
या प्रात्याक्षिकासाठी कृषिदूत, दिपक कोकणे, राहुल झडे, अमित मंडलिक, महेश जाधव, ऋषिकेश देवकर, सतिश कुमार, नरेंद्रनाथ बडीशेट्टी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कार्यक्रम समन्वयक अधिकारी प्रा. रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल खडके, प्रा. विशाखा देवकर, प्रा.सुदाम वर्पे, डॉ. गोविंद शिऊरकर, प्रा. वाल्मिक जंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.