वाघोली (प्रतिनिधी) : वाघोलीतील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मागील ३ महिन्यांपासून पुणे महानगर पालिकेकडुन रखडलेले वेतन त्वरित प्राप्त होणेकामी पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन अनिल सातव पाटील यांच्याकडून निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपा वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव व उपाध्यक्ष संदीप वारे उपस्थित होते.
याबाबत हवेली तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनिल सातव पाटील यांनी सांगितले की,
३०/०६/२०२१ रोजी नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन चे आदेशानुसार २३ गावांचा पुणे महानगर पालिकेमध्ये समावेश करणेत आलेला आहे. यामध्ये वाघोली गाव असुन २३ गावामध्ये क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे वाघोली गाव आहे.
वाघोली ग्रामपंचायतीमध्ये ९३ कर्मचारी कार्यरत असुन १/०७/२०२१ ते ०६/१०/२०२१ पर्यंत मनपाचे काम करीत आहेत.परंतु आजतागायत या सेवकांना कोणतेही वेतन दिले गेले नाही. या सर्व सेवकांना वेतन हे एकमेव उत्पनाचा स्त्रोत आहे व या वेतनावरच सर्व सेवकांचे कुटुंब अवलंबून आहे.
सलग तीन ते चार महिने वेतन नसल्याने या सेवकांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून कर्मचारी वर्गाला त्वरित वेतन आधार करण्याची मागणी अनिल सातव पाटील यांनी केली आहे याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने तांत्रिक अडचण दूर करून कर्मचारी वर्गाचे वेतन देण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना दिले.