नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या सुशील कुमारच्या जीवाला तुरुंगामध्ये धोका असल्याने सीआरपीएफसह तामिळनाडूच्या विशेष पोलिसांनाही त्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. मात्र शुक्रवारी मंडोलीच्या तुरुंगातून तिहार तुरुंगात शिफ्ट करण्यात आले. यावेळी दिल्लीतील काही पोलिसांनी सागर धनखड याच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या सुशील कुमार सोबत सेल्फी काढला.
सध्या सोशलवर हे फोटो व्हायरल होत असून नेटकऱ्यांद्वारे दिल्ली पोलिसांवर टीका केली जात आहे. आरोपीसोबत घेतलेल्या सेल्फी आणि फोटोशूटमुळे दिल्ली पोलीस अडचणीत सापडले आहेत .
व्हायरल फोटोमध्ये जवळपास १६ ते १७ पोलिसांनी त्याच्यासोबत फोटोसेशन केले . या फोटोमध्ये आरोपी सुशील कुमारला तिहार तुरुंगात नेण्यापूर्वी पोलिसांनी सुशीलबरोबर फोटोशूट केले या फोटोत सुशीलसह इतर पोलिसांनी अगदी हसत फोटोशूट केले. यातील काही पोलीस सिव्हील ड्रेसमध्ये होते. सुशील कुमार
दरम्यान,छत्रसाल स्टेडियममध्ये पाच मे रोजी युवा कुस्तीपटू सागर धनखड याची हत्या झाली होती. या हत्येत सुशीलसह त्याचा पीए अजय याची मुख्य भूमिका होती. मॉडल टाउन पोलिस स्टेशन परिसरातील छत्रसाल स्टेडियममध्ये एक फ्लॅट रिकामे करण्यावरून दोन गटात राडा झाला. या घटनेत पाच कुस्तीपटू गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी सागरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.