भोपाळ : भोपाळच्या भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. दरम्यान आता पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे हे काही लोकांसाठी देशभक्त असतील, मात्र मी करकरेंना देशभक्त मानत नाही असे प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा सध्या एका एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी आपण कारकरेंना देशभक्त मानत नसल्याचे म्हणत आहेत. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. व्हिडीओमध्ये “हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला.” असे विधान त्यांनी केले आहे.
#WATCH | BJP MP Pragya Thakur says, "An Emergency was imposed in 1975 & an Emergency-like situation had formed in 2008 when Sadhvi Pragya Singh Thakur was jailed in Malegaon blast case…People call Hemant Karkare a patriot, but those who are real patriots don't call him one…" pic.twitter.com/UgplzFd1d7
— ANI (@ANI) June 25, 2021
देशात एक आणिबाणी 1975 साली लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी ही 2008 साली लागल्याचे सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटे हेमंत करकरे यांनी तोडल्याचंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या 2008 साली मालेगावात झालेल्या स्फोटातील एक आरोपी आहेत. त्यावेळचे महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करत त्यांची चौकशी केली होती. दरम्यान,आपल्या शापामुळेच महाराष्ट्र केडरचे आयपीएस हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला असे वक्तव्य काही वर्षांपूर्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते .