नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्ली सरकार कोरोनाच्या पुढील लाटेसाठी पूर्णपणे तयार आहे. तत्पूर्वी, सीएम केजरीवाल यांनी कोरोनाच्या वाढत्या धोक्याबाबत मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली होती.
विदेशों में कोरोना के नए वेरिएंट की चर्चाओं के बीच आज दिल्ली में तैयारियों की समीक्षा की। https://t.co/zVNVpdyXc7
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) December 22, 2022
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, कोरोनाची पुढची लाट आल्यास दिल्ली सरकारने तयारी सुरू केली आहे. आरोग्य सेवेत वाढ करण्याबरोबरच रुग्णवाहिकांची संख्याही वाढवली जात आहे. याशिवाय बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांना जागरुक केले जाईल.