मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. दीपिकाची 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या विशेष आणि अत्यंत प्रतिष्ठित ज्युरी मेंबर्सचा भाग होण्यासाठी निवड झाली आहे. 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरी मेंबर्सच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. चाहत्यांना ही आनंदाची बातमी अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करून दिली आहे.
कान्स फिल्म फेस्टिव्हल हे या वर्षी 17 मे ते 28 मे या दरम्यान आयोजित केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या आठ सदस्यीय ज्युरीमध्ये भारतीय सुपरस्टार दीपिका पदुकोणचा समावेश करण्याची घोषणा कान्स फिल्म फेस्टिव्हल केली आहे. या ज्युरीचे अध्यक्ष फ्रान्समधील प्रसिद्ध अभिनेता विंसेट लिंडन असणार आहे.
View this post on Instagram
दीपिकासोबत ज्युरीमध्ये इराणी चित्रपट निर्माते अशगर फरहादी, स्वीडिश अभिनेत्री नूमी रॅपेस, अभिनेत्री पटकथा लेखक निर्माती रेबेका हॉल, इटालियन अभिनेत्री जास्मिन त्रिंका, फ्रेंच दिग्दर्शक लाडो ली, अमेरिकन दिग्दर्शिका यांचा समावेश आहे. दिग्दर्शक जेफ निकोल्स आणि नॉर्वेचे दिग्दर्शक जोआकिम ट्रियर आहेत.
दीपिकाने तिच्या शानदार कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्यासाठी अभिनेत्रीला अनेक समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे. यापूर्वी दीपिका अनेकवेळा या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर थिरकली आहे, मात्र यावेळी ती ज्युरी सदस्य म्हणून या सोहळ्याला उपस्थित असणार आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवरुन ही मोठी खुशखबर दिली आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पोस्टमध्ये तिच्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ‘दीपिका पादुकोण ही भारत देशातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती प्रोड्यूसर, सोशल वर्कर आणि अभिनेत्री आहे. तिने 30 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. xxx: Return of Xander Cage या चित्रपटामधून तिने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या पीकू आणि छपाक या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘