मुंबई – या वर्षीचा ‘ऑस्कर 2023’ हा आपल्या भारत देशासाठी एक अभिमानाचा क्षण घेऊन आला आहे. एकीकडे ‘चेल्लो शो’ आणि ‘आर आर आर’चे ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्करसाठी नामांकन झाले आहे, तर दुसरीकडे आता बॉलिवूड अभिनेत्री ‘दीपिका पदुकोणला’ही ऑस्कर पुरस्काराची जोड मिळाली आहे. दीपिका पदुकोण 13 मार्च रोजी होणाऱ्या ऑस्करची प्रस्तुतकर्ता असेल. खुद्द दीपिका पदुकोणनेच चाहत्यांना ही माहिती दिली आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील अभिनेत्री आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
दरम्यान, दीपिका पदुकोणने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर याची माहिती देताच दीपिकाच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दीपिका पदुकोण ऑस्करची प्रेझेंटर बनल्याच्या बातमीने बॉलिवूड स्टार्समध्येही खळबळ उडाली आहे. नेहा धुपियापासून पती रणवीर सिंगपर्यंत सर्वांनीच अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
दीपिकाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये असेही सांगितले की, “यावेळी ड्वेन जॉन्सन, मायकेल बी. जॉर्डन, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल. जॅक्सन, मेलिसा मॅककार्थी, झो सालडाना, जोनाथन मेजर्स, क्वेस्टलव्ह आणि डॉनी येन ऑस्करमध्ये सादरकर्ते आहेत. याशिवाय रिझ अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, एरियाना डीबोस, जेनेल मोने आणि सॅम्युअल एल. जॅक्सन हे ऑस्कर सादरकर्ते असतील’. असं ती म्हणतील आहे.