काही दिवसांपूर्वी “सीता’ या विषयावर काही सिनेमांची तयारी सुरू असल्याचे समजले होते. अलौकिक देसाईने “सीता द इन्कार्नेशन’ची घोषणा केली होती. त्याबरोबरच सीतेच्या रोलसाठी काही अभिनेत्रींची निवड झाल्याचेही समजले होते. त्यामध्ये दीपिका पदुकोण आणि कृती सेननच्या नावांची चर्चा होती.
आता त्यामध्ये करीना कपूर खानच्या नावाचीही भर पडली आहे. करिनाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजले आहे. मात्र त्याची अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. जर करिनाने या रोलसाठी पूर्ण तयारी दर्शवली नाही, तर हा रोल आलिया भटला मिळण्याची शक्यता आहे, असेही समजले आहे.
करिना सीतेच्या रोलसाठी एकदम परफेक्ट आहे, असे अलौकिक देसाई आणि कथेचे लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांना वाटते आहे. या सिनेमाचे कथानक सीतेच्या नजरेतून बघितल्याप्रमाणे असणार आहे. म्हणून रामायणाच्या आधाराने बनणाऱ्या अन्य सिनेमांपेक्षा हा सिनेमा वेगळा असणार आहे, असे अलौकिक देसाईंचे म्हणणे आहे.
सध्या करीनाचे वेळापत्रक आणि तिच्या मानधनाच्या मुद्दयावर चर्चा सुरू आहे. जर हे गणित जमले नाहीच, तर आलियाचा विचार केला जाऊ शकतो. याशिवाय “आदिपुरुष’ हा रामायणावर आधारीत आणखी एक सिनेमा होतो आहे. त्यात प्रभास रामाच्या भूमिकेत, कृती सेनन सीता आणि सैफ अली खान रावण बनणार आहे.