नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे विविध धातूंचे दर सध्या अस्थिर आहेत. जागतिक बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीचे दर कमी झाले. त्या प्रमाणात भारतीय बाजारातही सोने आणि चांदीचे दर कमी झाले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 339 रुपयांनी कमी होऊन 48,530 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 475 रुपयांनी कमी होऊन 70,772 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,893 डॉलर तर चांदीचा दर 27.79 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसात सोन्याचे दर वाढून पाच महिन्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नफेखोरी होत असल्यामुळे सोन्याचा दर कमी होत आहेत.