मुंबई – आयपीएलचे अधिकृत प्रायोजक असलेल्या चीनच्या व्हिवो कंपनीबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. देशात चीनविरोधी लाट निर्माण झाली असून देशवासीयांच्या भावनांचा आदर करत निर्णय घेतला जाइल असेही बीसीसीआयने सांगितले आहे.
व्हिवोने गेल्या काही वर्षांपासून आयपीएलचे प्रायोजक म्हणून सहकार्य केल आहे. त्यामुळे केवळ बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी स्पर्धेतील सर्व संघांच्या मालकांशी चर्चा करुन तसेच सरकारच्या मताचीही प्रतीक्षा केली जाईल. लोकभावनेचा नेहमीच आदर केलेला आहे, त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.