जनाधार आणि सनदशीर मार्गाने लढा देणार

खेडशिवापूर टोलनाका हटाव समितीचा निर्णय

कापूरहोळ – पुणे-सातारा महामार्गावर भोर व हवेली तालुक्‍याच्या हद्दीवर उभा असलेला वादग्रस्त टोलनाका हटविण्यासाठी मावळ्यांनी कंबर कसली आहे. यासाठी मोठे जनआंदोलन उभारून आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत भोर वेल्हा हवेली तालुक्‍यातील ग्रामपंचयतीचे ठराव करून वादग्रस्त खेडशिवापूर टोलनाका कायमचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

केळवडे ता भोर येथे शनिवारी (दि. 7) पुणे सातारा महामार्गाच्या प्रलंबित समस्याबाबत स्थापन झालेल्या खेडशिवापूर टोलनाका हटाव संघर्ष कृती समितीच्या दुसरऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या बरोबर संयुक्त बैठक घेण्यात यावी, यासाठी सोमवारी (दि 9) रोजी निवेदन देण्यात येणार आहे. भोर, वेल्हा, मुळशी, हवेली व पुरंदर तालुक्‍यातील सर्व पक्षीय समावेशक असलेल्या नागरिकांनी स्थापन केलेल्या खेडशिवापूर टोलनाका हटाव संघर्ष कृती समितीची दुसरी बैठक केळवडे ( ता. भोर ) येथे शनिवारी दुपारी चिंतामण हॉटेलच्या हॉलमध्ये पार पडली.

यावेळी दिलीप बाठे, पोपट जगताप, लहूनाना शेलार, आर. के. रांजणे, डॉ. संजय जगताप, डॉ. पुष्कर दलाल, राहुल देशपांडे, विलास बोरगे, ज्ञानेश्‍वर दारवटकर, ऍड. चिंतामण घाटे, गोरख मानकर, जीवन कोंडे, देवदत्त कोंडे, दिलीप फडके, दादासाहेब पवार, विजय जंगम, आदी उपस्थित होते. पुणे सातारा महामार्गवरील शिंदेवाडी ते सारोळापर्यंत रस्त्याची कामे ही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांच्या मनमानी पद्धतीने सुरू असून शासनाचा त्यावर अंकुश राहिला नाही कोणत्याही कराराचे पालन होताना दिसत

या विषयावर चर्चा होणार – 
बैठकीत रुंदीकरणाचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यत शिवापूर टोलनाका बंद करणे, नागरीवस्तीत (पीएमआरडीए) असणारा टोलनाका स्थलांतरित करणे, पुणे-सातारा महामार्गावरील अपूर्ण कामे जोपर्यंत 100 टक्के पूर्ण होत नाहीत तोपर्यंत टोल आकारणीला पूर्ण स्थगिती द्यावी, अपघातांत मयत आणि अपंगत्वाला जबाबदारी निश्‍चित करणेबाबत, सदोष मनुष्यवधाच्या गुन्हे, सदोष कामकाज,आणि सुरक्षा आदी गंभीर बाबीबाबत निराकरण या विषयावर चर्चा होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)