कापूरहोळ – कापुरव्होळ (ता.भोर) येथील नारायणपुर सासवड रोडवरील चप्पल दुकान रात्री ८.३० वाजता अचानक आग लागल्याने पाच लाख रूपयांच्या आसपास चप्पलीचे नुकसान झाले. भोर नगरपालिकाचा अग्निशामक गाडी आल्यानंतर रात्री ९.३० वाजता आग आटोक्यात आली व आजूबाजूच्या दुकानाचे मोठे नुकसान ठळले.
कापुरव्होळ ग्रामस्थांनी चप्पल दुकानाला आग लागल्याचे लक्षात येताच विझवण्याचा आटोकाट प्रयत्न ठेवला. भोर अग्निशामक गाडी लगेच आल्याने आसपास दुकानाचे नुकसान ठळले. आग लागण्याचे कारण विद्युत शाॕटसर्किट झाल्याचे चप्पल दुकानदार चंद्रकांत पोटे यांनी सांगितले.
त्यावेळी ग्रामस्थ उद्योजक लखन दळवी , राजेंद्र गाडे पाटील , योगेश गाडे पाटील ,समिर गाडे पाटील, पोलीस पाटील सय्यद शेख ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी मदत केली.दुकानाला आग लागताच राजगड पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक राहुल साबळे पाटील , सहाय्यक फौजदार अंकुश खोमणे , मदने व महामार्ग पोलीस हवालदार भिमराव शेगर ,धायगुडे ,अमोल खुटवड , उपस्थितीत राहुन वाहतुक कोंडी व अनुचित प्रकार घडू नये प्रयत्न केला.