हिंदु कुटूंबाने तीन मुले जन्माला घालावी

भाजप नेत्याचे बेताल वक्‍तव

लखनऊ : अनेकदा देशात भाजपा नेत्यांकडून करण्यात आलेल्या विधानांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळे मागेच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून या नेत्यांना कोणतेही वादग्रस्त विधान करण्यास तंबी देण्यात आली होती. पंतप्रधानांच्या आदेशानंतरही भाजपा नेत्यांची वायफळ बडबड सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण उत्तर प्रदेशातील मंत्री सुनील भराला यांनी हिंदू कुटुंबाने तीन मुले जन्माला घाला असा सल्ला दिला आहे.

सुनील भराला यांनी हे वक्‍तव्य केले आहे. त्यांनी हे वक्‍तव्य करत असताना आज समाजात फक्त दोन मुलांना जन्म द्यावा अशी मागणी केली जाते. मात्र असा कोणताही कायदा नाही, बहुतांश हिंदू कुटुंब एकाच मुलाला जन्म देतात. मला वैयक्तिक वाटते की, हम पॉंच याचा विचार हिंदू कुटुंबांनी करायला हवा. प्रत्येक कुटुंबात तीन मुले आणि त्यात एक मुलगी असायला हवी असे त्यांनी सांगितले. तसेच हैदराबाद येथे जे घडले ते दुर्दैवी आहे. पोलिसांनी चांगले काम केले, उन्नाव घटनेबाबतही उत्तर प्रदेश सरकार गंभीर आहे. गुन्हेगारांना सोडणार नाही असा इशाराही मंत्री सुनील भराला यांनी दिला आहे.

एकीकडे देशभरात लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करावा अशी मागणी होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अशा कायद्याची गरज आहे असे सांगितले आहे. मात्र सुनील भराला यांच्या विधानामुळे भाजपाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. इदरीशपूर गावातील एका समारंभात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.