लोणी काळभोर -हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील दोन बड्या ग्रामपंचायतींच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांचा करोनामुळे खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे मागील दहा दिवसांत पूर्व हवेलीमधील मृत्यू झालेल्यांची संख्या दहावर पोचली आहे.
उरुळी कांचन, नायगाव, आळंदी म्हातोबाची, थेऊर येथील प्रत्येकी एक तर कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील प्रत्येकी दोघांचा मागील दहा दिवसांत मृत्यू झाला.
यात गुरुवारी दोनची भर पडली. तर दुसरीकडे उरुळी कांचन 5, लोणी काळभोर 7, कदमवाकवस्ती 13, कुंजीरवाडी 7, सोरतापवाडी 4, थेऊर 1 असे 37 रुग्ण 24 तासांच्या कालावधीत आढळून आले आहेत.