20.48% बाधित सापडण्याचे सरासरी प्रमाण
पुणे – शहरातील करोना बाधितांची संख्या पुन्हा वाढत असून, गुरुवारी दिवसभरात 1 हजार 440 बाधित सापडले आहेत. तर, जिल्ह्यातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 264 इतका झाला आहे. यात पुणे शहरात 62 हजार 037, पिंपरी-चिंचवड-26,118 तर, ग्रामीण-9950, कॅन्टोन्मेंट हद्दीतील 2159 बाधितांचा समावेश आहे.
शहरात करोना विषाणूच्या नमुने तपासणीचा तीन लाखांचा टप्पा पार झाला असून, त्यामध्ये आतापर्यंत एकूण 62 हजार 37 बाधित सापडले आहेत. म्हणजे तपासणीच्या संख्येने 20.48 टक्के बाधित सापडले असून, हेच प्रमाण महिन्यापूर्वी 16.30 टक्के होते.
गुरुवारी शहरात 1,440 बाधित सापडले. दिवसभरात 5 हजार 208 जणांची नमुने तपासणी करण्यात आली. तर, दिवसभरात 1,196 जण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 43 हजार 606 बाधित ठणठणीत बरे झाले आहेत.
सध्या शहरात 16,975 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 674 जणांची प्रकृती चिंताजनक दिवसभरात 32 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. मृतांची आतापर्यंतची एकूण संख्या 1,456 वर पोहचली आहे.