केतकावळे : भिवडी (ता. पुरंदर) येथील 75 वर्षीय वृद्धाचा पुण्यातील ससून रुग्णालयात हृदयविकारावर उपचार सुरू असताना शनिवारी (दि. 11) रात्री मृत्यू झाला. दरम्यान, त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी (दि. 12) पॉझिटिव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
वृद्धाचा मृतदेह रुग्णालयामध्येच असून अंत्यविधी शासकीय नियमानुसार पुण्यात करण्यात येणार असल्याचे पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित मयत व्यक्तीचा 100 ते 150 जणांसोबत संपर्क आला असल्याने प्रशासनापुढे एक आव्हानच म्हणावे लागेल.