कळंबी येथे वार झाल्याने चालकाचा म्रुत्यू

औंध – पुसेसावळी- रहिमतपूर रस्त्यावर कळंबी येथे मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोच्या चालकावर अज्ञातांनी वार केल्याने त्याचा म्रुत्यू झाला.रविराज लोखंडे (वय ४२, रा. रहिमतपूर) बुधवारी रात्री पावणेनऊ वाजता पुसेसावळीवरुन रहिमतपूरकडे टेम्पो घेऊन निघाला असताना कळंबी येथील दूध सकलन केंद्रासमोर अज्ञातांनी त्याच्यावर धारदार हत्याराने वार केले व ते पसार झाले. कळंबी ग्रामस्थांनी धाव घेतली.

पोलीस पाटलाने औंध पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांना लोखंडे यास पुसेसावळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता लोखंडे मरण पावल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.औंधचे एपीआय भापकर अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.