मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे भारतीय राजकारणातील मोठं नाव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रिय कृषीमंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पेलवल्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. शरद पवार यांच्याकडे पाहिलं की अनेकांना संघर्षाची प्रेरणा मिळते. आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या खासदार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस असून सोशल मीडियावरुन अनेकांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सुप्रिया सुळेंचाही समावेश असल्याचं यातून दिसून येत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर वडिलांसोबतचा एक फोटो आणि सुंदर कॅप्शन लिहत शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रिय बाबा,
तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. pic.twitter.com/DgeMVg7OyD— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2022
“प्रिय बाबा, तुम्ही आम्हा सर्वांसाठी उर्जेचा अखंड स्रोत आहात. समाजकारण, राजकारण या क्षेत्रांसह कौटुंबिक पातळीवर देखील तुम्ही आम्हा सर्वांचे आदर्श आहात. तुमच्या विचारांची स्वाभिमानी मशाल घेऊन आम्ही सर्वजण आपल्यासोबत अविश्रांत चालण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबा, तुम्हाला निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!’ या आशयाचे कॅप्शन त्यांनी लिहलं आहे.