दौंड (प्रतिनिधी) – शहरातील नेहरू चौक येथील 90 वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजीबाई दौंड तालुक्यातील करोनाचा दुसरा बळी ठरल्या आहेत.
मंगळवारी (दि. 26) दौंड शहरातील करोनाचा पहिला बळी गेला होता. त्याच दिवशी शहरातील नेहरू चौक येथील नव्वद वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्या महिलेवर पुणे येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी (दि. 29) रात्री या महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला.
पुणे येथील स्मशानभूमीत त्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.