मंचर (प्रतिनिधी) – गांजवेवाडी (ता. आंबेगाव) येथे करोनाबाधित रुग्णाच्या पत्नीलाही तसेच गिरवलीतील बाधिताच्या संपर्कात आलेल्या एकास करोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 27 वर पोहोचली आहे. शिनोलीतील बाधिताने करोनावर मात केल्याने 27 पैकी 26 जणांवर उपचार सुरू आहेत.
(दि.30) संबंधित महिलेचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गिरवली येथे पुन्हा एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील एकूण 30 संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर दोन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
(दि.27) गांजवेवाडी, गिरवली येथे मुंबई येथून आलेल्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळाले होते. प्रशासनाने तातडीने गांजवेवाडी (वळती), गिरवली ही गावे सील केली आहेत. शुक्रवारी त्याच्या संपर्कातील दोन रुग्णांचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहे.