दौंड (प्रतिनिधी) – दौंड शहरात पुन्हा एक महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा दौंड शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील 90 वर्षीय महिलेस करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक संग्राम डांगे यांनी दिली. दौंड शहरातील गोवा गल्ली येथील 70 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी (दि. 25) मृत्यू झाला आहे.
आज पुन्हा दौंड शहरात 90 वर्षीय महिलेस करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेच्या संपर्कातील नागरिकांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचेही डॉ. डांगे यांनी सांगितले. दरम्यान दौंड शहरातील करोना बाधितांची संख्या एकने वाढली असुन मृतांची संख्याही एक झाली आहे.