बारामती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त थेट बारामती व त्यांच्या आवडीचा डार्क चॉकलेट बुके थेट विधानभवनात पोहोचवला. शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांनी अशा अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा फडणवीस यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी पत्नी मेघना यांच्यासह फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. त्यांना आवडणारा डार्क चॉकलेट बुके भेट देत त्यांना शिवसेना पुणे जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
देवेंद्र फडणीस यांच्या मागील वाढदिवसाच्यावेळी बारामती शहरात महिलांसाठी जेवरे यांनी चार स्वच्छतागृह स्वखर्चाने बारामती नगरपालिकेत भेट दिली होती. ही बाब त्यांनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर असताना सुरेंद्र जेवरे यांनी त्यांना देखील बारामती परिसरातील पिकणाऱ्या फळे, फुले, धन्य यापासून बनवलेला आगळावेगळा बुके देत लक्ष वेधले होते.