शिरूर – येथील आर. एम. डी धारिवाल इंग्रजी माध्यम शाळेच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला एलिमेंटरी परीक्षेत 96 टक्के, तर इंटरमिजीट परीक्षेत 94 टक्के निकाल लागला आहे. या दोन्ही परीक्षेत मुलांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
आर. एम. डी इंग्लिश शाळेतून 184 विद्यार्थ्यांनी या दोन्ही परीक्षेत सहभाग घेतला होता. यापैकी 29 विद्यार्थ्यांना श्रेणी प्राप्त झाली आहे.
एलिमेंटरी परीक्षेमध्ये श्रेणी प्राप्त विद्यार्थी – सृष्टी भवर, केतकी कातोरे, नेहा कोकाटे, सार्थक महाजन, अनुष्का शितोळे, सिद्धांत वाळुंज , सानिका तिवारी, आर्याकी व्यवहारे. इंटरमिजीएट परीक्षेमध्ये श्रेणी प्राप्त विद्यार्थी- जानवी चांदगुडे, मृणाली चराटे, भूमिका चौधरी, दिशा धुमाळ, दिशा दुगड, संग्राम गायकवाड, प्रतिज्ञा गव्हाणे, तन्मय जाधव, वैष्णवी जाधव, श्रावणी जोशी, श्रावणी खराडे, स्नेहल खरमाळे, जिनिया मलगुंडे, दिव्या मेसे, वैष्णवी म्हातारमारे, आयुष्य नाकोड, सिद्धांत पाटील, मयुरी संकपाळ, श्रेया सांबारे, चैताली थेऊरकर, आदिती यादव या विद्यार्थ्यांना प्रशालेचे कलाशिक्षक नामदेव क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिरूर प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, सचिव तु. म. परदेशी, सहसचिव बाबासाहेब चोरमले, पर्यवेक्षक तांबोळी यांनी अभिनंदन केले.