शिक्रापूर, (वार्ताहर)- दरेकरवाडी (ता. शिरुर) येथील शेतकर्यांच्या शेतातील कांदा खरेदी करुन कोणताही मोबदला न देता चौघा शेतकर्यांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. याबाबत व्यापार्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वनाथ रामचंद्र घोगरे (रा. शिरसोली, निघोज, ता. पारनेर) असे या व्यापार्याचे नाव आहे. याबाबत पोपट लक्ष्मण दरेकर (वय 79, रा. दरेकरवाडी) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विश्वनाथ घोगरे हा कांदा व्यापारी आलेला असताना त्याने गावातील पोपट दरेकर, सीताबाई भोसले, अंकुश दरेकर, योगीराज दरेकर या शेतकर्यांचा कांदा खरेदी करुन त्याने आणलेल्या वेगवेगळ्या ट्रकमधून घेऊन गेला.
त्यांनतर शेतकर्यांनी कांद्याचे पैसे मागण्यासाठी वेळोवेळी संपर्क केला असता, आज देतो उद्या देतो असे म्हणून टाळाटाळ करु लागला, त्यांनतर शेतकर्यांचे फोन उचलणे देखील बंद केल्याने शेतकर्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने शेतकर्यांनी पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवीकिरण जाधव करीत आहेत.