मुंबई – जेम्स बॉंड अभिनेता डॅनिएल क्रेगला ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये ऑनररी कमांडर केले गेले आहे. हे पद डॅनिएल क्रेग याने पडद्यावर साकारलेल्या जेम्स बॉंडच्या पदाच्या समकक्ष आहे. याबाबतची घोषणा गुरुवारी करण्यात आली आहे.
डॅनिएल क्रेगने सर्वांत शेवटी “नो टाईम टू डाय’मध्ये जेम्स बॉंडचा रोल केला होता. रॉयल नेव्हीमध्ये ऑनररी कमांडर म्हणून त्याला पद देण्याचा समारंभ झाल्यावर त्याचा सन्मान करण्यात आला. जेम्स बॉंडचा रोल डॅनिएल क्रेगने पुन्हा एकदा साकार केला आहे.
त्याचा शेवटचा जेम्स बॉंडचा रोल असलेला सिनेमा आता रिलीज व्हायला तयार झाला आहे. आजच म्हणजे मंगळवारी या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमिअर होणार आहे. डॅनिएल क्रेगने 2006 पासून केवळ जेम्स बॉंडचेच रोल केले आहेत.
गेल्या 15 वर्षांपासून तो कमांडर बॉंड म्हणूनच ओळखला जातो आहे. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीच्या माध्यमातून सर्व जगभरातील समस्या निवारण करण्यासाठी प्रचंड चातुर्य आणि पराक्रम करण्याचे काम किमान पडद्यावर तरी जेम्स बॉंडच्या रूपात डॅनिएल क्रेगने करून दाखवले आहे. त्यामुळे डॅनिएल क्रेगला रॉयल नेव्हीचा कमांडर केला जाण्याबद्दल नेव्हीने आनंद व्यक्त केला आहे.