नवी दिल्ली – सराफा बाजारात सोने- चांदीच्या भावात आज घसरण झाली असून 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 45,030 रुपये आहे. आधीच्या ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 45,280 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच बंद झाली होती. चांदीचे भाव 60,450 रुपये प्रति किलोवर आले आहेत.
मुंबई शहरात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,030 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 46,030 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे शहरात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 44,470 आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,610 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,030 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,030 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 605 रुपये आहे.