#DakPay : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे ‘डाक पे’ डिजिटल पेमेंट अ‍ॅप लाॅन्च

नवी दिल्ली – भारतीय डाक विभाग (India Post) आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने ( India Post Payments Bank )  ‘डाक पे’ ( DakPay )  हे एक नवीन डिजिटल पेमेंट अ‍ॅप लाॅन्च केले आहे. आज एका व्हर्च्युअल कार्यक्रमात केंद्रीय माहिती, तंत्रज्ञान आणि दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद  यांच्या उपस्थितीत या अ‍ॅपचे लाॅन्चिंग करण्यात आले. 

यावेळी मंत्री रविशंकर प्रसाद ( Ravi Shankar Prasad )यांनी कोव्हिड-19 महामारी विरूध्दच्या लढाईदरम्यान इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने केलेल्या कामाचे तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक  लाॅन्च झाल्यापासून 2 वर्षापेक्षा कमी कालावधीत 3 कोटी खात्यांचा टप्पा गाठल्याबदल  सर्व कर्मचाऱ्यांचे  कौतुक केले. 

‘डाक पे’  ( #DakPay )केवळ डिजिटल पेमेंट ( Digital Payments ) अ‍ॅप नाही तर याव्दारे संबंधित बँक आणि इतर टपाल सेवा देखील मिळणार आहेत. ‘डाक पे’ मध्ये डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड स्कॅन करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे.

डाक पे विषयी……….

यूजर्सनां ‘डाक पे’ अ‍ॅप गूगल प्ले-स्टोरवर मोफत डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड केल्यानंतर नाव,मोबाइल क्रमांक आणि पिनकोड इत्यादी माहितीसह तुम्हाला प्रोफाइल बनवावी लागेल. यानंतर तुम्ही तुमच्या बॅक अकाउंटला या अ‍ॅपसोबत लिंक करू शकता.

तुम्ही एकापेक्षा अधिक बॅक अकाउंटसुध्दा अ‍ॅपसोबत लिंक करू शकता. यांनतर तुम्ही यूपीआय सारखे पैसे ट्रान्सफर करू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला यूपीआय अ‍ॅपसारखा चार अंकी पिन बनवावा लागेल. या अ‍ॅपव्दारे तुम्ही किराणा स्टोर ते शाॅपिंग माॅल्ससह इतर अन्य ठिकाणी पेमेंट करू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.