बारामती (पुणे) – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व महा विकास आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शहरातील सात शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शंभर बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्योजक दादासाहेब दराडे, समाजसेविका कल्पना काटकर यांनी सामाजिक जाणिवेतून शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात शंभर बॅग रक्त संकलित करण्यात आले. बारामती ऍग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, नगरसेवक सूरज सातव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पुणे जिल्हा संघटक कल्पना थोरवे, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख देवेंद्र बनकर, रामचंद्र बनकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर पार पडले. पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख राजेंद्र भिलारे, बारामती महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख शालिनी देशपांडे, कीर्ती पाठक यांचे मार्गदर्शन लाभले. आकाश सोनार, ऋषी जाधव, देवेंद्र बनकर, अनिकेत चव्हाण, सचिन झुंज, निलेश कसबे, संभाजी शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर व तालुक्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेत पद्मविभूषण शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातव महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेतले. शिबिरात 100 बाटल्या रक्त संकलित झाले. पिंपळी येथील ब्लड बॅंकेचे सहकार्य लाभले. पुढील काळात देखील समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचा मानस आहे.
– दादासाहेब दराडे, उद्योजक, बारामती.