अहमदाबाद – गुजरातमध्ये मंगळवारी 17 हजार 119 नवे करोनाबाधित आढळले. त्या राज्यातील बाधित संख्येतील दैनंदिन वाढीचा तो आजवरचा उच्चांक ठरला.
याआधी गुजरातमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी 30 एप्रिल 2021 या दिवशी 14 हजार 605 बाधित आढळले होते. त्या राज्यातील एका दिवसातील बाधित संख्येचा तो उच्चांक ठरला होता. आता तो मागे पडला आहे.
मागील काही दिवसांपासून गुजरातमधील बाधित संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्या राज्यातील अहमदाबाद, सुरत आणि वडोदरामध्ये करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. एकट्या अहमदाबादेत मंगळवारी 5 हजार 998 बाधितांची नोंद झाली. गुजरातमधील एकूण बाधितांची संख्या आता 9 लाख 56 हजारांवर गेली आहे. त्यामध्ये जवळपास 80 हजार सक्रिय बाधित आहेत.