Mumbai Fire News : मुंबईतल्या काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. येथे एकापाठोपाठ आठ सिलेंडर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट हवेत पसरले असून नागरिकांची एकच धांदल उडाली होती.
काळाचौकी परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. सिलेंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
Maharashtra | Fire broke out at a BMC school Kalachowki area of Mumbai. The school was closed when the fire broke out. Five fire tenders reached the spot and started controlling the fire. No injuries have been reported in this fire incident yet: BMC
— ANI (@ANI) January 15, 2024
काळाचौकी मिंट कॉलनी परिसरात असलेल्या साईबाबा पथ संकुल शाळेमध्ये हा सिलेंडरचे स्फोट झाले आहे. कोविडमध्ये या शाळेचा वापर केला गेला होता. त्यानंतर ही शाळा बंदच होती. मात्र इथे वापरण्यात आलेले ऑक्सिजन सिलेंडर तसेच पडून होते. त्यातील सिलेंडरचा स्फोट झाल्याचे म्हंटले जात आहे. या घटनेनंतर बचावकार्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या प्रकरणाची अधिक माहिती घेतली जात आहे.