Amitabh Bachchan : राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा अभिषेक सोहळ्यासाठी पाहुण्यांची यादी अंतिम केली जात आहे. अभिषेक सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट सात हजार पाहुण्यांना आमंत्रित करत आहे. यामध्ये देशातील विविध परंपरांचे संत आणि धर्मगुरू, कलाकार, साहित्यिक, क्रीडा व्यक्ती, न्यायाधीश, उद्योगपती आदींचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह तीन हजार व्हीव्हीआयपी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
या यादीत “भारतरत्न’ विजेता क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहली, अमिताभ बच्चन, कंगना रणौत, दीपिका चिखलिया, अक्षय कुमार, गायिका आशा भोसले, अरुण गोविल, उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ, पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित व्यक्तींनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्येत घरासाठी प्लॉट खरेदी केला आहे. 10,000 स्केअर फुटाच्या या फ्लॉटची किंमत 14.5 कोटी रुपयांच्या आसपास आहे. बिग बींनी ‘द हाऊस ऑफ अभिनंद लोढा’ या बॅनरअंतर्गत अयोध्येत प्लॉट विकत घेतला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या अयोध्येतील घराच्या कामाला 22 जानेवारी 2024 पासून सुरुवात होऊ शकते. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी राममंदिराचं उद्घाटन करत असताना दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेल्या फ्लॉटवर काम सुरू होईल. मात्र, अद्याप स्वतः बिंग बींनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. राम मंदिर उद्घाटनामुळं आसपासच्या जिल्ह्यांच्या विकासाच्या गतीला एक बूस्टर डोस मिळाला आहे. तेथील हॉटेल उद्योग, छोटे व्यापारी आणि स्थानिक उद्योग आता जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवणार आहेत.