Gautami Patil – नेहमीच संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा होत असते. ते नाव म्हणजे ‘सबसे कातील गौतमी पाटील…’ दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च.
कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच गौतमीच्या कार्यक्रमांच्या तारखा मिळणं देखील मुश्किल असतं. आणि म्हणूनच तिची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत असते.
नुकताच गौतमी पाटील ही लातूर शहरात एका बिर्याणी हॉटेलच्या ओपनिंगसाठी पोहचली. यावेळी गौतमी पाटील हिची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. पाय ठेवायला देखील अजिबातच जागा नव्हती. मात्र, यावेळी गौतमी पाटील हिची एक झलक पाहण्यासाठी काही युवक हे थेट विद्युत डीपीवरच चढून बसले.
धक्कादायक बाब म्हणजे या टीपीमध्ये विद्युत प्रवाह सुरूच होता. शेवटी हा प्रकार गौतमी पाटील हिच्याच लक्षात आला आणि तिने त्या युवकांना खाली उतरण्याची विनंती केली. या युवकांचे नशीब बलवत्तर की, कोणताही चुकीचा प्रकार घडला नाही. दरम्यान, यापूर्वी देखील गौतमीच्या कार्यक्रमात असे विचित्र प्रकार घडल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे.